हेरले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले) येथे सिद्धिविनायक नर्सिंग होम व सयुंक्त बौद्ध समाज यांच्या सयुंक्त विद्यमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.
शिबिरामध्ये प्रा. प्रभूदास खाबडे यांच्या शुभ हस्ते मूर्ती पूजन करून शिबिरास सुरवात झाली.शिबिराचे आयोजन हे विशाल परमाज ,प्रभाकाश कुरणे,राहुल कटकोळे,सुरज कदम यांनी केले.
या आरोग्य शिबिराचा ८०लोकांनी लाभ घेतला. यापैकी ६० जनांचे मोफत इलेक्ट्रोकारडीओग्राम करण्यात आले. शिबिरास पंचायत समिती माजी सभापती जयश्री कुरणे,ग्रामपंचायत सदस्य बथुवेल कदम,उर्मिला कुरणे,ग्रामपंचायत सदस्य आरती कुरणे, संदीप चौगुले,बाजीराव कटकोळे ,संदीप कोले,अशफाक देसाई,रुपाली खाबडे हे उपस्थित होते. स्वागत बाजीराव कटकोळे यांनी केले. आभार विशाल परमाज यांनी मानले.
फोटो
हेरले : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन प्रा. प्रभूदास खाबडे यांच्या शुभ हस्ते मूर्ती पूजन करून झाली.