हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या कामाची पाहणी जि .प .च्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केली. व सरपंच काशिनाथ कांबळे यांच्याकडून राष्ट्रीय ग्रामीण योजनेच्या कामाविषयी सध्या स्थितीचा आढावा घेतला.
मौजे वडगाव येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही २०१८ साली माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या फंडातून व माजी आमदार अमल महाडिक व शौमिका महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाली. परंतु दोन वर्षे कोरोना चा काळ असल्याने सदर योजनेचे काम थोडे दिवस बंद होते. सध्या फिल्टर हाऊस व किरकोळ कामे वगळता ही योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे .तरी येत्या दोन-तीन महिन्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे कम पूर्ण करून गावासाठी शुद्ध व मुबलक पाणी देण्याचा मार्ग सुकर करावा अशा सूचना शौमिका महाडिक यांनी प्रशासनाला दिल्या.
यावेळी सरपंच काशिनाथ कांबळे, दत्त सेवा संस्थेचे माजी चेअरमन श्रीकांत सावंत, ग्रा .पं. सदस्य अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे, मधुकर अकीवाटे, स्वप्नील चौगुले, जयवंत चौगुले, अमोल झांबरे ,सागर आकिवाटे, शितल परमाज, पप्पू पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची पाहणी करताना जि .प .च्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, सरपंच काशिनाथ कांबळे, श्रीकांत सावंत, व मान्यवर (छाया सुरेश कांबरे)