--पालकांनी जागरूक राहणे काळाची गरज आहे.
हेरले प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी रँगीग , मोबाईलचा दुरुपयोग करणे यासारख्या गोष्टीत राहू नये. स्वतःचे करिअर करून आई, वडील, गाव , गुरु व महाविद्यालयाचे नाव उज्वल करा. विद्यार्थ्यांनी क्षनिक सुखाच्या मागे न लागता भविष्यकाळाचा विचार जबाबदारीने रहावे. धावत्या युगात कुटुंबातील संस्कार झालेले विद्यार्थी नेहमी चांगल्या गोष्टीत पुढे असतात. पालकांनी जागरूक राहणे ही काळाची गरज आहे .लहानपणापासूनच मुलांच्या अभ्यासाबरोबरच वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन गडहिंग्लज विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले. त्या नवे पारगाव ता हातकणंगले येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाच्या आयोजित विद्यार्थी पालक जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या .अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय प्रतिनिधी डॉ .शिल्पा कोठावळे
होत्या .स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हरीष कुलकर्णी यांनी केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन दीपप्रज्वलन झाले. अधीक्षक जयश्री गायकवाड भाषणात पुढे म्हणाल्या महिलांच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्र पोलिसांचे प्रत्येक पोलिस ठाण्यात निर्भया पथक तैनात असून घटना घडल्यास पंधरा ते अठरा मिनिटात निर्भया पथकाची मदत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. विद्यार्थीदशेत हातून चूक होऊन गुन्हा दाखल झाल्यास भविष्यकाळात गंभीर अडचणींना सामोरे जावे लागेल. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रवेश घेतलेल्या व नीट परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या भाषणात डॉ .शिल्पा कोठावळे यांनी दंत महाविद्यालयातील गुणवत्तेविषयी व सोयी-सुविधांची माहिती दिली. तसेच नवनिर्वाचित विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा पुढे सुरु ठेवावी असे सांगितले.
याप्रसंगी डॉ सविता ठक्कनवार, डॉ रजनी कुलकर्णी, डॉ सूर्यकांत मेटकरी, डॉ के के माने ,डॉ अभिजीत शेटे, डॉ संगीता गोलवलकर, डॉ किशोर चौगुले, डॉ शिल्पा शेट्टी, डॉ सुधा पाटील - हंचनाळे ,डॉ राहुल ढाले, डॉ नंदन ,डॉ विना, डॉ अंकुर कुलकर्णी ,डॉ स्नेहल शेंडे, डॉ योजना पाटील डॉ शर्मिष्ठा घोडके , डॉ डेव्हिड उपस्थित होते. सूत्रसंचालन अथर्व महाडिक रिया रोचलानी यांनी केले आभार डॉ सुमित शेठगार यांनी मानले
फोटो 1)नवे पारगाव येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ हरीश कुलकर्णी सोबत व्यवस्थापकीय प्रतिनिधी डॉ शिल्पा कोठावळे
2) नवे पारगाव येथे तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड