हेरले / प्रतिनिधी
पंचायत समिती सदस्या महेरनिगा मुनिर जमादार यांनी आपल्या फंडातून पाण्याचा टँकर ग्रामपंचायतीस दिला त्यांचे कार्य स्तुत्य आहे. असे प्रतिपादन
माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
ते हेरले (ता. हातकणंगले) येथे पाण्याचा टँकर लोकार्पण सोहळा निमित्त कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
उन्हाळ्याचा कडाका तीव्र आहे. पृथ्वीचे तापमान वाढत चालते आहे. त्यासाठी झाडांची संख्या वाढविण्यासाठी वृक्षरोपण महत्त्वाचे आहे. हेरले येथे निसर्ग प्रेमी तरुणांनी केलेल्या वृक्षारोपणाचे कार्य स्तूत्य आहे. अशा प्रकारे प्रत्येक गावात तरुणांनी वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य करावे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या कार्यास सदैव मदतीस तत्पर आहे.
शासनाने जमिनीचा पोत व वातावरणाचा अभ्यास करून वृक्षारोपण केल्यास झाडे जगतील. निसर्गास अनुरूप वृक्षारोपण केल्यास झाडे वाढतील. शासन प्रत्येक वर्षी शतकोटी वृक्षारोपण करते मात्र झाडे किती जगली व वाढली हा संशोधनचा मुद्दा आहे.
स्वागत राहूल शेटे यांनी केले,प्रास्ताविक विशाल परमाज यांनी केले.मनोगत ॲड. प्रशांत पाटील, मुनिर जमादार यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य अशोक माने, जिल्हा परिषद सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार, मुनिर जमादार, सरपंच अश्विनी चौगुले, ॲड. प्रशांत पाटील, महमंद खतीब, उदय चौगुले, रोहन पाटील, माजी उपसभापती अशोक मुंडे, बख्तियार जमादार, अमर वडु,सुरेश चौगुले, दीपक जाधव, अभी चौगुले, अबु जमादार, अभिनंदन करके, अनिकेत पाटील आदी मान्यवरांसह निसर्ग प्रेमी तरुण उपस्थित होते.
फोटो
हेरले : पंचायत समिती सदस्या महेरनिगा मुनिर जमादार यांच्या फंडातून पाण्याचा टँकर लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी बोलतांना माजी खासदार राजू शेट्टी व अन्य मान्यवर.