हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले) येथे
श्री १००८ भगवान महावीर तीर्थंकर यांचा जन्मकल्याणक महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सकल दिगंबर जैन समाज वीर सेवा दल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रम या प्रमाणे रविवार दि. १० एप्रिल रोजी स. ९ ते दु. ३ वा. रक्तदान शिबीर रक्तदात्यास प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येईल.
शिबीर स्थळ- जैन मंदिर हॉल
सोमवार दि. ११ एप्रिल रोजी दु. १ वा. लहान मुलांच्या विविध स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा दोरी उड्या स्पर्धा होतील.
मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी सायं. ७ वा. सांस्कृतिक कार्यक्रम सचिन चौगुले (उदगांव) यांचा भक्तिगीत, भावगीत व संगीत आरतीचा कार्यक्रम सदर कार्यक्रमामध्ये रथ व ७ घोडे यांचे सवाल काढणेत येतील.
बुधवार दि. १३ एप्रिल रोजी दु. १ वा. महिलांसाठी विविध स्पर्धा रांगोळी स्पर्धा, कळस सजावट स्पर्धा, अष्टद्रव्य सजावट स्पर्धा होईल.
गुरुवार दि. १४ एप्रिल रोजी श्री १००८ भगवान महावीर जयंती स. ७ वा. : पंचामृत अभिषेक पूजा स. ८ वा. भगवान महावीर जन्मकाळ सोहळा स. ९.३० वा. भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येईल.
शुक्रवार दि. १५ एप्रिल रोजी सायं. ७ वा. रथोत्सव भगवान महावीर जयंती निमित्त रथ, घोडे व वाद्यपथकांसह भव्य रथोत्सव मिरवणूक होईल.
शनिवार दि. १६ एप्रिल रोजी सायं. ७ वा. धर्म को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धा होईल.
रविवार दि. १७ एप्रिल रोजी स. १० ते दु. २ पर्यंत स्नेहभोजन शनिवार दि. ३० एप्रिल ते रविवार दि. ०१ मे २०२२ स. ९ ते ५ वा. युवती सक्षमीकरण शिबीर आयोजीत केले आहे.स्पर्धेतील विजेत्यांना योग्य बक्षिसे प्रदान करण्यात येतील.