हेरले / प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञता महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी व शैक्षणिक वर्ष २०२२ / २३ च्या शैक्षणिक नियोजनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे मार्फत तालुकानिहाय सभांचे आयोजन त्यानुसार दि.१९ रोजी कोल्हापूर शहर व करवीर तालुका यांची सहविचार सभा घेण्यात आली. दि.२१रोजी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा कर्मवीर शैक्षणिक संकुल कुंभोज येथे पार पडली.
मुख्याध्यापक संघाच्यवतीने सर्व अधिका-यांचे स्वागत करण्यात आले . प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे यांनी केले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. लोकराजा राजर्षि शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञतापूर्वच्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शन, कथाकथन स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच ग्रंथप्रदर्शन या संदर्भाने माहिती दिली.तसेच ग्रंथप्रदर्शनास द्यावयाच्या भेटीचे तालुका निहाय नियोजन सांगितले. पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजनाच्या अनुषंगाने शाळा सिद्धी स्वच्छ विद्यालय पुरस्कार, विविध पत्रके परिपत्रके, आधार कार्ड अपडेशन, महाराष्ट्र लोकसेवा हक्क, अधिनियम-२०१५ च्या कलम तीन मधील पोटकलम एक अन्वये लोकसेवा घोषित करणे याचे मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, एनटीएस, एनएमएमएस शिष्यवृत्ती संदर्भामध्ये नियोजन करणे यासाठी मार्गदर्शन केले. सभेसाठी प्रभारी उपशिक्षणाधिकारी बी.डी. टोणपे, एस.बी.मानकर, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अजय पाटील
तसेच सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सहविचार सभेसाठी हातकणंगले तालुक्यातील १०२ मुख्याध्यापक तर शिरोळ मधील ६५ मुख्याध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन सागर माने यांनी केले. आभार सागर चुडाप्पा यांनी मानले.
या प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे इरफान अन्सारी, प्राचार्य डी.एस. घुगरे, जितेंद्र म्हैशाळे, पी. डी. शिंदे,खंडेराव जगदाळे, अशोक हुबाळे आदी मान्यवरांसह तालुक्याचे पदाधिकारी व सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फोटो
कुंभोज : माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करतांना.