कोल्हापूर / प्रतिनिधी
भान ठेवून वाचन संस्कृती वाढविण्याचे ध्येय ठेवा आणि बेभानपणे ते पूर्ण करा. वाचन संस्कृती ग्रंथप्रसार हा शिक्षण व्यवस्थेचा गाभा आहे. शिक्षकांनी वाचते व्हावे, आणि विद्यार्थ्यांनी वाचन करावे असे आवाहन प्रसिध्द विचारवंत व व्याख्याते इंद्रजीत देशमुख यांनी केले.
ते कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या उत्कृष्ट शालेय समृध्द ग्रंथालय स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ हे होते.
प्रारंभी संघाचे सचिव दत्ता पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले. संघाच्या वाटचालीचा धावता आढावा घेवून वाचन संस्कृती आणि प्रसार समृध्द करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. संघाचे कार्यकारी मंडळाचे संचालक व स्पर्धेचे संयोजक प्राचार्य जीवन साळोखे यांनी या पुरस्कार प्राप्त शाळांना आज सातशेहून अधिक पुस्तके त्यांच्या ग्रंथदान उपक्रमातून भेटीदाखल देत अकरा हजार पुस्तक (ग्रंथ) देण्याचा टप्पा पूर्ण केला. याचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
यावेळी बोलताना इंद्रजीत देशमुख यांनी अनेक उत्तमोत्तम पुस्तकांचे दाखले देत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. माणसांचे आयुष्य ख-या अर्थाने श्रीमंत करावयाचे असेल तर वाचनाला पर्याय नाही. वाचनामुळे माणसाच्या आयुष्याला अर्थ आणि आशय प्राप्त होतो. पंचदानासारखा उपक्रमातून राबविला गेला पाहिजे. विद्यार्थी शिक्षक वाचते झाले तरच उज्ज्वल भविष्य आहे.
यावेळी संघाचे व्हा. चेअरमन मिलिद पांगिरेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य जीवन साळोखे यांनी स्पर्धेमागील भूमिका विशद करून वाचन संस्कृती समृध्दीचे आणि ग्रंथदान उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. सुत्रसंचलन संचालक रविंद्र मोरे यांनी केले तर आभार संघाचे व्हा. चेअरमन बी. आर. बुगडे यांनी मानले.
यावेळी महाराष्ट्र राज्य शाला कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, संघाचे जॉ. सेक्रटरी अजित रणदिवे, ट्रेझरर नंदकुमार गाडेकर, लोकल ऑडिटर इरफान अन्सारी, संचालक सुरेश उगारे, सखाराम चौकेकर, श्रीकांत पाटील, जितेंद्र म्हैशाळे, गुलाब पाटील, संजय देवेकर, एस.एस. चव्हाण ,माजिद पटेल, एन. एस. घोलप, संजय भांगरे, शिवाजी संचालिका अनिता नवाळे माजी संचालिका सुनंदा भागवत व आदी मान्यवरांसह पारितोषिक पात्र शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
फोटो
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित उत्कृष्ट शालेय सम्रुध्द ग्रंथालय स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात ग्रंथ भेट, सन्मान चिन्ह आणि प्रतिमा देताना ज्येष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख, चेअरमन सुरेश संकपाळ, स्पर्धा संयोजक व ग्रंथदाते प्राचार्य जीवन साळोखे,सचिव दत्ता पाटील व इतर मान्यवर.