हेरले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले) महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून हजारी कोपरा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा - चर्मकार समाज व बौद्ध समाज या वसाहतीस जोडणारा रस्ता वीस लाख रुपये निधीच्या डांबरीकरणाचे उद्घाटन तसेच गावभाग मातंग समाज ( साई कॉलनी परिसर ) काँक्रीट रस्ता पाच लाख रुपये निधीच्या कामाचे उद्घाटन व पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार यांच्या फंडातून पाण्याच्या टँकरचे लोकार्पण सोहळा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमा प्रसंगी जि.प. सदस्य अशोक माने,माजी सभापती राजेश पाटील, जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार , सरचिटणिस मुनिर जमादार, सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच फरीद नायकवडी, गुरुनाथ नाईक, ॲड. प्रशांत पाटील, उदय चौगुले, माजी उपसभापती अशोक मुंडे,आबू जमादार, राहूल शेटेसह सर्व ग्रा पं सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
फोटो
हेरले : जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील यांच्या फंडातून विकास कामाचा शुभारंभ करताना माजी खासदार राजू शेट्टी व अन्य मान्यवर.