हेरले / प्रतिनिधी
सह्याद्री शिक्षण समूहाचे संस्थापक छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज पेडगावचे प्राचार्य व अंबप गावचे माजी उपसरपंच राजेंद्र माने यांचा वाढदिवस विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.
चार दिवसाच्या कालावधीमध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये कोडोली स्पोर्ट्सचा प्रथम क्रमांक , द्वितीय क्रमांक रेटरे धरण स्पोर्ट्स विजेत्या संघांना रोख रक्कम व शील्ड देण्यात आले.
१५एप्रिल रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यामध्ये १२२ लोकांनी रक्तदान केले. विवेक वाचानालय अंबप यांना आवश्यक असणारे फॅन भेट देण्यात आले. शिये येथील करुणा अनाथ आश्रमात मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले .त्याच बरोबर कोल्हापूर येथील एकटी अनाथालयातील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले अशा विविध उपक्रमाद्वारे राजेंद्र माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या सर्व उपक्रमांमध्ये अंबप व अंबप पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. जि.प.सदस्य दलितमित्र अशोकराव माने अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने होते. खालील मान्यवर प्रमुख उपस्थित होते जि.प.सदस्या मनिषाताई माने. माजी पंचायत समिती सदस्य विकासराव माने, पंचायत समिती सदस्य व माजी सभापती डॉ.प्रदीप पाटील, वारणा साखर कारखान्याचे संचालक प्रा. प्रदीप तोडकर,अंबप गावचे लोकनियुक्त सरपंच बी एस अंबपकर, उपसरपंच कृष्णात गायकवाड, ग्रा.प. सदस्य डॉ . मिलींद पाटील, बंडा हिरवे, माजी सरपंच विश्वनाथ पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष माजी सरपंच संतोष उंडे, माजी सरपंच संपतराव कांबळे, अशोकराव माने फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ . एन बी चौगले , राजेंद्र हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप पाटील , पाडळी गावचे माजी सरपंच प्रकाश पाटील, अंबपवाडीचे माजी सरपंच पांडुरंग खोत,डेसरपंच पिंटू खोत, मनपाडळे गावचे सरपंच रायबाराजे शिंदे, उपसरपंच उल्हास वाघमारे अंबप गावचे पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड , भाजप सरचिटणीस दिपक ढाले, डि.के.माने,दिनकर सूर्यवंशी , महेश माने बबन चिबडे, म्हाकूजी हिरवे, सर्जेराव वाघमोडे, अजित माने,रोहीत चिबडे, प्रथमेश माने,विनायक चिबडे ,रणजीत चिबडे, सतीश मोरे ,राजू काळे ,कुमार वाघमोडे, आदर्श रिक्षा युनियनचे अध्यक्ष रमेश निलजे, काकासो जगताप राजेंद्र युवा मंचचे सर्व कार्यकर्ते विविध तरुण मंडळाचे सदस्य बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते तसेच सह्याद्री शिक्षण संस्था पूर्ण पूर्ण सेवकवर्ग उपस्थित होता.