स्पर्धा परीक्षेमध्ये भरीव कामगिरी
कोल्हापूर / प्रतिनिधी
शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मुरगूड ता. कागल येथील मुरगूड विद्यालय (हायस्कूल व ज्युनि कॉलेज) या बहुउद्देशीय विद्यालयाचा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गौरव होणार आहे.शाळेने केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्र समाज भूषण या राज्यस्तरीय पुरस्काराने शाळेला सन्मानित करण्यात येणार आहे.सदरचा पुरस्कार इंडियन टॅंलेट सर्च लातुर या संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.अशी माहिती प्राचार्य एस. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वातंत्र्य पूर्व काळात 1 मे 1946 रोजी मुरगूड ता.कागल येथे कोल्हापूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेद्वारे मुरगूड विद्यालय या प्रशालेच्या स्थापना करण्यात आली.लोकशाही हाच लोकशिक्षणाचा पाया या ब्रीद वाक्याने सुरू झालेल्या या शाळेने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केलेले आहे.या कार्याची नोंद घेत या शाळेला हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून याची माहिती शाळेला मिळालेल्या पत्राद्वारे झाली असून नाशिक या ठिकाणी मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
शाळेने दहावी आणि बारावी च्या बोर्ड परीक्षेमध्ये नेहमीच उज्वल कामगिरी केली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे.यामध्ये पाचवी आणि आठवी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ,त्याच बरोबर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती (एन एम एस एस)एन.टी. एस राष्ट्रीय प्रज्ञा शोध आदी स्पर्धा परीक्षेमध्ये शाळेने उज्वल कामगिरी केली आहे.याबरोबर शासकीय रेखाकला व क्रीडा क्षेत्रात ही शाळेने भरीव कामगिरी केली आहे.या सर्वांची नोंद शासन पातळीवर घेतल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पुरस्कारासाठी संस्थेचे सचिव प्रा. जयकुमार देसाई,अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई,उपाद्यक्ष शिवाजीराव सावंत,चेअरमन लीना सावंत,युवा नेते दौलतराव देसाई,प्रशासनाधिकारी डॉ मंजिरीताई देसाई मोरे,कौन्सिल मेंबर,कोजीमाशी चे चेअरमन बाळ उर्फ लक्ष्मण डेळेकर,शालेय समिती चे चेअरमन प्रविण सिह पाटील यांचे प्रोत्साहन लाभले तर शाळेचे प्राचार्य एस .आर.पाटील,उपप्राचार्य एस. पी. पाटील,उपमुख्याद्यापक एस. बी. सूर्यवंशी,पर्यवेक्षक एस. एच. निर्मळे, तंत्र विभाग प्रमुख पी बी लोकरे,कार्यालयीन प्रमुख एम. एस. कांबळे व शिक्षक शिक्षकेत्तर, पालक,आजी माजी विद्यार्थी
यांचे प्रयत्न मोलाचे ठरले.