आरोग्य तपासणी विशेष मोहीम आढावा बैठकीमध्ये सरपंच, ग्रामसेवकांना, जि प अध्यक्षांनी केल्या सूचना
उदगीर प्रतिनिधी -गणेश मुंडे
उदगीर तालुक्यांमध्ये कोरोना चे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यामुळे उदगीर तालुक्यातील सर्व 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची बीपी,शुगर,किडनी आजार, डायलिसिस,हार्ट चे प्रॉब्लेम आहेत का ? यांची माहिती घेऊन आवश्यक व त्या व्यक्तींना लगेच वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध राहावे याकरिता महसूल प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे आढावा बैठक संपन्न झाली.50 वयापेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेणे विशेष मोहिमेच्या पूर्व तयारीची बैठक शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे घेण्यात आली या बैठकीला उदगीर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी,उदगीर तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पंचायत समितीचे सभापती विजयकुमार पाटील,उदगीर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य रोडगे मॅडम, बापूराव राठोड, यांच्यासह विविध सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच,ग्रामसेवक आदी उपस्थित होते.