Tuesday, 23 June 2020

mh9 NEWS

मौ. वडगांव येथे एचपीसीएल गॅस कंपनीकडून त्रिपक्षीय करार होत नाही तोपर्यंत ना हरकत दाखला नाही - असा ठराव जिप मुख्य कार्य. अधिकारी अमन मित्तल यांना सादर

हातकणंगले / प्रतिनिधी
    
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील ग्रामपंचायतीने एच.पी. सी. एल. ऑईल इंडिया कंपनीने गॅस स्टेशनसाठी मागणी प्रमाणे  एक एक्कर जागा पाच अटीची पूर्तता करण्याच्या शर्तीवर  दि.५ मार्च २०१९ रोजी ग्रामसभेच्या ठरावानूसार दिली. मात्र  आजपर्यंत कंपनीने  सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांबरोबर ठरावातील अटी व शर्ती बद्दल कोणतीही प्रशासकीय चर्चा केली नाही. त्या अटींची पूर्तता न करता 'ना हरकत' दाखल्याची मागणी कंपनीकडून केल्याने सरपंच काशिनाथ कांबळे व अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना भेटून जो पर्यंत पाच अटी संदर्भात लेखी 'त्रीपक्षीय करार 'होणार नाही, तो पर्यंत सदर कंपनीस कोणत्याही प्रकारचा 'ना हरकत दाखला' ग्रामपंचायतीकडून दिला जाणार नाही असा ठराव सर्वानुमते करून भूमिका मांडली.
        मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील गट नं ५१२ मधील एक एक्कर जागा एच.पी.सी.एल. ऑईल इंडिया कंपनीला गॅस स्टेशनसाठी जागा देणे बाबत दि. ५ मार्च २०१९ रोजी ६७ ग्रामस्थांच्या उपस्थित ग्रामसभा सरपंचांच्या परवानगीने सविस्तर चर्चा करून कंपनीने पाच अटीस अधीन राहून गट नं ५१२ मधील एक एक्कर जागा देण्याचे गाव सभेत सर्वानुमते ठरले.

                   चौकट
      त्या पाच अटी या प्रमाणे  
१)कंपनीने गट नं ५१२ मध्ये बांधकाम चालू करण्यापूर्वी शाळेचे कंपाऊंड व शौचालये बांधून देणे. २) गट नं ५१२मध्ये तलाव आहे जो पर्यंत कंपनी अस्थित्वात आहे तोपर्यंत तलावाचे पाणी कंपनीमुळे दूषीत होणार नाही याची काळजी घेणे. ३) गॅस पाईपलाईन ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात असेल त्या शेतकऱ्यांचे जे काही नुकसान होईल त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देणे कंपनीला बंधनकारक आहे.४ ) कंपनीने आपल्या एकूण सी.एस.आर. मधील रक्कमेच्या १० टक्के रक्कम प्रतिवर्षी गावच्या विकास कामे करण्यास दयावी.५ ) कोल्हापूर जिल्ह्यास गॅस पुरवठा करतेवेळी गावाला सुद्धा गॅस पुरवठा करावा अशा अटी घालून ठराव मंजूर करण्यात आला होता.
      मात्र आजतागायत या अटीची पुर्तता न करता एच.पी.सी.एल. ऑईल इंडिया कंपनीने गट नं ५१२ पैकी ४ हजार चौ.मी. जागेमध्ये कोल्हापूर शहर गॅस वितरण प्रकल्प (गेट स्टेशन) करणेसाठी ग्रामपंचायतीकडे गावातील 'कोणाची हरकत आहे अगर कसे '? या बाबतचा हरकत दाखला मागणी केलेला आहे.  कंपनीने जागा मागणी ठरावामध्ये नमुद केलेल्या अटी व शर्तीचे आज अखेर कोणतीही पुर्तता केलेली नसल्याने  ग्रामपंचायत मौजे वडगाव कडील  दि. २६ मे २०२० मासिक सभा ठराव क्र. १२ / ८ नुसार कंपनीस कोणत्याही प्रकारचा 'ना हरकत दाखला ' देणेत येऊ नये असा ठराव सर्वानुमते पारीत केला आहे.
       या बाबत चर्चा करणेसाठी सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते आदींचे शिष्टमंडळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना सोमवारी भेटले.जो पर्यंत जि.प. कोल्हापूर प्रशासन, एच.पी.सी.एल. ऑईल कंपनी व ग्रामपंचायत यांचा 'त्रीपक्षीय करारान्वे'  पाच अटी मान्य होऊन व त्याप्रमाणे सीएसआर फंडामधून गावच्या विकास कामाची प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, तो पर्यंत 'ना हरकत दाखला' देण्यात येणार नाही.अशी ठाम भूमिका मांडून त्या आशयाची सर्वानुमते केलेल्या ठरावाची प्रत देण्यात आली.
     या शिष्टमंडळामध्ये सरपंच काशिनाथ कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील,अवधूत मुसळे, सुभाष अकिवाटे,   शिवसेना शहरप्रमुख माजी उपसरपंच सुरेश कांबरे,ग्रामपंचयत सदस्या माधूरी सावंत, सरिता यादव ,सुनिता मगदूम, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील चौगुले, सुनिल खारेपाटणे, तानाजी गोरड  ,अमोल झांबरे, प्रा. प्रदिप रजपूत , आदी मान्यवर उपस्थित होते.

         फोटो - जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना ठरावाची प्रत देतांना मौजे वडगावचे सरपंच काशिनाथ कांबळे  अविनाश पाटील अवधूत मुसळे सुरेश कांबरे व इतर ग्रामपंचायत सदस्य.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :