शिरोळ प्रतिनिधी
ज्ञान दान करणारे गुरूवर्य शिक्षक यांना आपल्या भारतीय संस्कृतीत मानाचे सर्वोच्च स्थान आहे , शिक्षक हा नुसताच पुस्तकातील अभ्यास शिकवत नसतो तर तो मुलांना आकार देत असतो , त्या आकारातुनच एक सक्षम युवक , नागरीक व यातुनच मजबुत देश तयार होतो , कलेक्टर , अधिकारी , व्यापारी , उदयोजक , सैनिक , राष्ट्रपती , आमदार , खासदार , मंत्री , पोलीस , एक आदर्श नागरीक या सर्वांना शिक्षक च घडवतात म्हणुन गुरुवर्य शिक्षकांना आपल्या देशात प्रथम वंदनीय स्थान शिक्षकांना दिले जाते , पण सध्या या गुरुवर्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे , कोल्हापुर जिल्हयात अशी घटना घडली आहे , मा. शिक्षक श्री हणमंत आण्णासो वाघमारे सर यांना कोल्हापुर जिल्हा परिषद मधील विस्तार अधिकारी यांच्याकडुन हिन दर्जाच्या वागणुकीला सामोरे जावे लागले आहे.
अमानुष वागणूक देण्या-या शिक्षण विस्तार अधिका-यावर कारवाई करणेबाबत निवेदन मा .मुख्यकार्यकारी अधिकारी , मा .जिल्हा परिषद अध्यक्ष , मा .शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले , निवेदन देताना महाराष्ट्र राज्य डिसीपीएस संघर्ष समितीचे कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष श्री करणसिंह सरनोबत सर, जिल्हा उपाध्यक्ष सतिश लोहार सर, जिल्हा सदस्य सचिन कांबळे सर ,संदीप जाधव, सचिन जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.