कंदलगाव ता .३० ,
विज वितरण विभागाने चुकीच्या पद्धतीने काढ़लेली वाढीव विज बिले पूर्वी प्रमाणे प्रती महीना करुन द्यावीत म्हणुन आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे आर.के.नगर व मोरेवाडी येथे विज वितरण कार्यालया शेजारी आंदोलन केले.
गेल्या तीन महीन्यापासुन आधीच कोरोणाच्या महामारीमुळे लॉकडाउन व त्या अनुशंगाने आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेने आर.के.नगर , मोरेवाडी, कंदलगाव परीसरातील चुकीच्या पद्धतीने आलेल्या वाढीव विज बिलाच्या समस्येने हवालदील झालेल्या नागरिकाचे निवेदन आज कार्यकारी अभियंता विठ्ठल चौगुले यांना देऊन वाढीव वीजबिला संबंधी तातडीने ख़ुलासा करावा व विज बिले दुरुस्त करुन मिळावित म्हणुन सर्वांची बिले परत दिली . व ही तीन महीन्याची एकत्रित आलेली बिले प्रती महीना करुन द्यावित असे सांगीतले, या चुकीच्या पद्धतीने काढलेल्या बिलांवर योग्य तो मार्ग काठावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश हुन्नुरे, अदित्य भाट, अथर्व साळुंखे, मुस्ताक देसाई,आकाश साबळे , कवीता आबळे , रेषा सावंत , सुरेखा गुरव , राधा खरे व भागातील नागरिक उपस्थित होते .
फोटो - आर .के. नगर विज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देताना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे सदस्य .