कसबा बावडा प्रतिनिधी दि. 16
संपूर्ण राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूरात जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कसबा बावडा येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. आज सायंकाळी बंधाऱ्यावरुन एकफूट पाणी वाहत होते. यापूर्वीच कोरोना पार्श्वभूमीवर बंधाऱ्यावरुन वाहतूक बंदी घालण्यात आली आहे. रात्री पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे विनाकारण पाण्यातून जाणे टाळावे.