**
रजनिकांत वानखडे
वाशिम प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येत असलेल्या सोनाळा येथील पंधरा ते 20 शेतकऱ्याने पेरणी केली असता बियाणे निघाले नसल्याने शेतकरी मोठा अडचणीत आला असून संबंधित दुकानदाराकडून शेतकऱ्याचे मोठी फसवणूक झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की सोनाळा येथील शेतकऱ्यांनी मालेगाव येथील दुकानातून आदित्य व इतर कंपनीचे बी बियाणे आणले होते व सदर शेतकऱ्याने रविवारी आपल्या शेतीची पेरणी केली परंतु आठ दिवस उलटून सुद्धा आज पर्यंत बियाने निघाले नसल्याने व बी उगवले नसल्याने शेतकऱ्याने संबंधित आता करायचे तरी काय असे बोलल्या जात करोणा च्या संकटात ज्या शेतकरी आपल्या शेतीवर देशाला तारले आज तो शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सोनाळा येथील 20 ते 25 शेतकऱ्यांनी मालेगाव इथून बियाणे विकत घेऊन ट्राक्टरच्या साह्याने पेरणी केली असून आठ दिवस होत असुन सुद्धा आज पर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात पिक उगवले नाही त्यामुळे या शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली असून पुन्हा बियाणे आणून पुन्हा ट्रॅक्टर च्या साह्याने पेरनी करावी लागणार असून या काळात शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून याकडे कृषी विभागाने चौकशी
करणे गरजेचे आहे.