सैनिक टाकळी प्रतिनिधी
राजापूर तालुका शिरोळ येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे . गेल्या दोन दिवसापासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाल्याने वारणा पंचगंगा कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये वाढ होत आहे. यावर्षी पावसाळा वेळेत सुरू झाल्याने जून महिन्यातच नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे .सध्या धरणांमधून 28500 क्युसेस चा विसर्ग सुरू आहे .गतवर्षी आलेल्या महापुराच्या भीतीचे सावट अद्याप ही लोकांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत आहे पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे परिसरामध्ये सध्या भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असून या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती यापूर्वीच महाराष्ट्र कर्नाटक राज्याला जाणारा रस्ता बंद केल्याने या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद होती.