योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर पहिलं आयुर्वेदिक औषध शोधल्याचं जाहीर केलं आहे. या औषधामुळे 100 टक्के रुग्ण बरे होतात आणि 0 टक्के मृत्यूदर असल्याचाही दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. त्यांनी हरिद्वार येथे या औषधाचं उद्धाटन केलं. श्वासारी वटी कोरोनील असं या औषधाचं नाव आहे.
रामदेव बाबा म्हणाले, “संपूर्ण देश आणि जग कोठे तरी कोरोनावरील औषध निघेल या आशेवर होतं. आज आम्ही कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं शोधलं आहे, अशी घोषणा करतो. पतंजली संशोधन संस्था आणि निम्स यांच्या संयुक्त विद्यमाने या औषधाचं संशोधन करण्यात आलं. ही औषधं वैद्यकीय तपासण्या आणि चाचण्यांमध्ये देखील सिद्ध झालं आहे. यासाठी मी या संशोधनातील सर्व वैज्ञानिकांचे आणि संशोधकांचे आभार मानतो. हा खूप अभिमानाचा दिवस आहे. पूर्ण जग पुराव्यांच्या आधारे संशोधित औषधांवरच अवलंबून आहे. आज अॅलोपॅथ संपूर्ण वैद्यकीय यंत्रणांचं नेतृत्व करत आहे.”
लवकरच हे औषध सर्व भारतभर आणि जगभरात उपलब्ध होणार आहे. याचे उत्पादन पतंजली दिव्य फार्मसी हरिद्वार येथे होणार आहे. दिव्य कोरोनील वटी चा प्रभाव पाच ते सात दिवसांत दिसून येतो असे रामदेव बाबा यांनी सांगितले आहे.