कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा धनगर समाजाच्या वतीने श्री प्रविण काकडे यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकीसाठी संधी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी प्रत्यक्ष तर काहींशी फोन द्वारे चर्चा करून पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब , मा.नामदार डॉ. विश्वजीत कदमसाहेब , आमदार पी.एन.पाटील साहेब, आमदार चंद्रकांत जाधव साहेब , आमदार ऋतुराज पाटील साहेब व आमदार राजूबाबा आवळे साहेब यांना शिष्टमंडळ भेटून लेखी निवेदन दिले आहे.अशी माहिती ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. शंकरराव पुजारी यांनी दिली आहे .
धनगर समाजाच्या राज्यभर विविध संघटना कार्यरत असून संपूर्ण देशभर कार्य करणाऱ्या "ऑल इंडिया धनगर समाज महासंघ" दिल्ली ,या संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ,श्री प्रविणजी काकडे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारकीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे संधी देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे .धनगर समाजातील सर्व स्तरावर त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे . विविध ठिकाणी वस्तीगृहात असणारे व महाविद्यालयात शिकणाऱ्या धनगर समाजातील हुशार गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे करून अनेकांना मदत करणारे आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे समाजातील पितृतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून लोकप्रिय बनत गेले . धनगर समाजाच्या आरक्षण लढाईत चळवळीत संपूर्ण देशभर आणि राज्यात अभ्यासपूर्ण व्याख्याना द्वारे समाज जागृती केली .न्यायालयीन लढाईसाठी चालू असलेल्या चळवळीला गट तट न पाहता पाठिंबा दिला .
प्रविण काकडे सरांचे हे कार्य नुसते महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्यांचे कार्य संघटनेच्या माध्यमातून देशातील विविध राज्यात सुरू आहे. दिल्ली, हरियाणा ,गुजरात ,कर्नाटक, गोवा ,अशा ठिकाणी त्यांनी आपले कार्य करत आहेत. महाराष्ट्र राज्यात व राज्याबाहेर विविध ठिकाणी कार्य करणाऱ्या प्रविण काकडे सरांच्या कार्याची सुरुवात 1997 पासून झाली आहे. आज पर्यंत कार्यरत असणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे म्हणूनच त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी संपूर्ण राज्यभर जोर धरू लागली आहे .
निवेदनामध्ये धनगर समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील नेते एकत्र आले आहेत .त्यामध्ये प्रा. राजेंद्र कोळेकर ,श्री. ओंकार कोळेकर,(पन्हाळा) , सचिन पुजारी , काशिनाथ पुजारी (हातकणंगले) , श्री. महादेव लांडगे , श्री.तानाजी लांडगे ,श्री.आनंदा करपे , श्री.प्रविण करपे (करवीर) , उद्योगपती श्री. निवास वाटेगावकर (कोल्हापूर), प्रा. मंगेश हजारे , श्री अनिल हजारे ( कागल), नेमिनाथ पुजारी , अजय हराळे (शिरोळ) व कोल्हापूर जिल्ह्यातील समाजबांधव उपस्थित होते.