उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
वाढवणा (बु) येथील रहिवाशी आणि दैनिक बालाघाटचा आवाज चे संपादक विधीज्ञ प्रमोद बिरादार यांच्या मातोश्री कै.सौ.भारतबाई बिरादार यांचे ७ जून रोजी दुःखद निधन झाले.त्यामुळे बिरादार परिवार वर दुःखाचा डोंगर कोसळला. या परिवारच्या दुःखात सहभागी होत राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे यांनी गुरुवारी या परिवाराचे घरी जाऊन सांत्वण केले.बिरादार परिवारास हा मोठा धक्का असून यातून यांना सावरून मोठे बळ मिळो अशीही यावेळी राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे यांनी प्रार्थनाही केली.तसेच त्यांनी सर्वप्रथम कै.सौ.भारतबाई बिरादार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार व्यंकटेश मुंडे,ॲड.दिगंबरराव बिरादार माजी कृषी सभापती तथा काँग्रेस चे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटिल,रा.काँ.चे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मुळे,पंचायत समितीचे सदस्य माधव कांबळे,माजी पं.स.सदस्य दत्तात्रय बामणे,विकास सहकारी साखर कारखाना तोंडार चे संचालक विनोबा पाटिल,गुडसूरचे उपसरपंच ॲड.अनिल लांजे,वाढवणा खुर्द चे उपसरपंच ज्ञानेश्वर भांगे, ॲड.पदमाकर उगिले,स.पो.नि.बाळासाहेब नरवटे,ग्रामविकास अधिकारी अरविंद शिंदे,चेअरमन विश्वनाथ काळे,संतोष सोमासे,आमोल फुलारी,शिवाजी चिकले,श्रेयश बिरादार,दत्ता उपासे,दिपक वाघडोळे,कृष्णा पांचाळ आदीजण उपस्थीत होते.