क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने विद्या मंदिर गिरगांव येथे शाहू जयंती साजरी करण्यात आली. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक विठ्ठल शिंगे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनामुळे गेले कित्येक दिवस शाळाना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे शाळेच्या परिसरात गवत उगवले होते व कचरा पडून होता . क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाड्याच्या मुलानी शाहू जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करत शाळेच्या परिसरातील स्वच्छता केली.
यावेळी संस्थेचे वस्ताद प्रमोद पाटील, भगवन गुरव , मेढे टिचर, काजल पाटील, सानिका जाधव, सानिका पाटील, शिवराज पाटील, पूर्णानंद जाधव, करन देसाई, विराज सरनाईक इत्यादी उपस्थित होते.
फोटो - गिरगाव येथील विद्यामंदिर परिसराची स्वच्छता करताना क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे संस्थेचे सदस्य .