कसबा बावडा कोल्हापूर
वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी असल्याने आषाढी पायी दिंडीला विशेष महत्त्व आहे. पूर्वापार चालत आलेली वारीची परंपरा बावडेकरांनी आजतागायत अखंड सुरू ठेवली होती. मात्र यावर्षी प्रथमच कोरोना पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर पायी आषाढी वारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन निर्णयानुसार यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात एकही पायी दिंडी काढण्यात येणार नसून याला सर्व वारकरी संप्रदायाने मान्यता दिली आहे.
यावर पर्याय म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आज कसबा बावडा येथील मोजक्या पताकाधारी वारकऱ्यांच्या मागे पायी दिंडीने मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रस्थान ठेवले. हा पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात गावातील नवनाथ मंदिर, दत्त मंदिर, ज्ञानेश्वर मंडप, तुकाराम मंडप, श्रीराम मंदिर येथे पाणी घालण्यात आले. यावेळी वारकरी दिंडी सोहळ्यातील वीणा व तुळस यांचे पुजन करून हा सोहळा संपन्न झाला.