नंदुरबार प्रतिनिधी - वैभव करवंदकर
अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने पाड्यांवरील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना वह्या, पेन व पेन्सीलचे वाटप करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज गायकवाड, जिल्हा संघटक सुरेश माळी यांच्याहस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सुरेश माळी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रेरणा मिळावी, यासाठी मार्गदर्शन केले. तसेच माळी संघाचे जिल्हाध्यक्ष मनोज गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करावा तसेच अभ्यासात रुची निर्माण व्हावी म्हणून शैक्षणिक साहित्याची मदत होईल, असे सांगितले. कोविड-१९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सर्वांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. तसाच परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. यातच गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना घरी अभ्यासात शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी म्हणून अ.भा.माळी महासंघातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.