*
प्रमोद झिले हिंगणघाट, वर्धा :-
हिंगणघाट तालुक्यातील खापरी येथील रहिवासी नितेश सोगे. नितेश एक महिन्याच्या असतांनाच आई मरण पावली वडीलच्या डोक्यात आधीपासूनच फरक असल्याने वडील कुठे आहे माहीत नाही नितेशचा सांभाळ गावातील राहात असलेल्या मामानी केला परंतु मामाची परिस्तिथी पण हालाकीचीच तरी पण कसे का होई ना मामानी सांभाळ केला परंतु दोन तीन वर्षांपासून नितेश गावातच अतिक्रमण जागेवर छोटीशी झोपडी बांधून राहात आहे व वडनेर येथे किराणा दुकानात काम करून वडनेर येथील साईबाबा महाविद्यालयात शिक्षण ही घेत असून या वर्षी बी.ए. चा आखरी वर्षाला शिकत आहे परंतु आई वडील नसल्याने त्याचा शिक्षणासाठी व इतर कामासाठी त्याला प्रत्तेक वेळी राशन कार्डचे वेळोवेळी काम पडते आणि त्याचे जवळ राशन कार्डच नाही म्हणून त्याला प्रत्तेक वेळी अडचणींचा सामना करावा लागत असल्याने राशन कार्ड साठी सगळी कडे चकरा मारून नितेश थकला शेवटी त्याला कुणीतरी हिंगणघाट येथील प्रहारचे रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचे नाव सांगून भाऊचा मोबाईल नंबर दिला काल नितेश हिंगणघाटला येऊन गजुभाऊला भेटला व सर्व हकीकत सांगितली असता आधी गजुभाऊ नि नितेशला नास्ता करायला लावून नंतर हिंगणघाट येथील तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा अधिकारी श्री टोंग साहेब यांना स्वतः भेटून नितेशचा राशन कार्ड संदर्भात सांगितले परंतु काही शासकीय अडचण असल्याने नितेशचे सर्व कागद पत्र आज गजुभाऊने स्वतः गोळा करून आज नितेशला राशन कार्ड मिळवून दिले ज्या कामासाठी नितेश दोन वर्षांपासून सर्वत्र फिरून झाले नाही ते काम रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे नि दोन दिवसात करून दिल्याने नितेशचा चेहर्यावर आनंद दिसून येत होते तेव्हढेच नाही तर या नंतर शिक्षणासाठी, आरोग्यासाठी व इतर कोणत्याही प्रकारची लागणारी मदत करण्याचे आश्वासन रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांनी दिल्याने नितेशनी आभार मानले तसेच अन्न पुरवठा अधिकारी श्री टोंग साहेब यांचे पण आभार मानले.