कसबा बावडा प्रतिनिधी
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज पाटील व आमदार ॠतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांच्या संकल्पनेतून कसबा बावडा स्मशानभूमीची नूतन इमारत जवळपास अडीच कोटीच्या निधीतून पूर्णत्वास आली असून बैठक व्यवस्था, कामगारांचे कार्यालय, दहन साहित्य, गोडावून व कमान इत्यादी बाबींची पूर्तता झाली आहे.
या वैकुंठभूमीमध्ये सुधारणेसाठी नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांनी पुढाकार घेतल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. दफन भुमीचे काम, आजुबाजुला बगीच्या निर्मिती, अॅपल सरस्वती हाॅस्पिटल यांचे पण योगदान लाभले आहे. बावड्यातील स्थानिक नागरिकांनी स्टील जाळी, वृक्षारोपण, राजाराम बंधारा ग्रुप कडून नंबर व नेमप्लेट, शामराव गुरव ब्रदर्स यांचेकडून कमानीवरील अॅक्रॅलिक बोर्ड , केळवकर हाॅस्पिटल व अॅड. निलेश नरूटे यांनी वाॅटर कुलर, सचिन पोवार यांनी सोलर सिस्टिम तसेच गौतम कांबळे यांच्या कडून दानपेटी इत्यादी बाबी देणगी स्वरूपात प्राप्त झाल्या असून आयुब जमादार, सचिन पाटील, सचिन उलपे यांनी यांनी देणगी स्वरूपात रोख रक्कम दिल्या आहेत. या स्मशानभूमीची नाविन्यपूर्ण इमारत आणि मुलभूत सुविधा यामुळे जनमाणसात आपुलकी निर्माण झाल्याने अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे.
या स्मशानभूमीची देखभाल व सातत्याने सुधारणासाठी स्मशानभूमीतील महानगरपालिकेचे कामगार यांच्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते तुषार नेजदार, सुभाष इंदुलकर, संदीप हुजरे, अनिल गवळी, दिलीप चित्रुक व बावड्यातील सर्व तरूण मंडळांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
सध्या दहनासाठी चौदा बेड असून लहान मुलांसाठी स्वतंत्र दफनभूमी सुध्दा आहे. पुढील काळात जर गरज भासल्यास आणखी विस्तारीकरण करण्यात येईल. नागरिकांचे सहकार्य, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ॠतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीसाठी सर्वतोपरी काम करत आहे.
डाॅ. संदीप नेजदार
( नगरसेवक को.म.न.पा. )