कोल्हापूर प्रतिनिधी दि. 17जून 2020
रुईकर कॉलनी प्रभाग क्रमांक २३ मध्ये लक्ष्मीनगर उद्यान येथे इनरव्हिल क्लब ऑफ सनराईज कोल्हापूर यांच्या माध्यमातून व स्थानिक नागरिक व दि नीड फाऊंडेशन यांच्या मागणीनुसार उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली.
त्यावेळेस इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ वसुधा लिंग्रज व सेक्रेटरी डॉ मयुरा खोत यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यावेळेस संस्थेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अध्यक्षा सौ वसुधा लिंग्रज व सेक्रेटरी डॉ मयुरा खोत यांचा सत्कार नगरसेवक ताराराणी आघाडी गटनेते सत्यजित कदम व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा विजयेंद्र माने यांनी केला . तसेच समाजसेवेतुन उल्लेखनीय कामगिरी बजावलेले श्री सुशांत टक्कळकी व श्री श्याम नायर व शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामधिल उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री नानासाहेब पाटील सर यांचा हि यावेळेस सत्कार करण्यात आला.
त्यावेळेस क्लब मेंबर्स अश्विनी सुवर्णा, शर्मिला खोत, स्मिता खामकर, मंजिरी देवन्नावर, तसेच राजू भोपे, राकेश अंदानी,राजू पावनगडकर ,अमित रसाळ,नागेश गावडे ,वृषभ नरसगोंडा,आशुतोष लोंढे व स्थानिक नागरिक उपस्थित होते