माजगाव प्रतिनिधी-
मा श्री राजारामजी वरुटे सर राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुका प्राथमिक शिक्षक संघ महिला तालुका कार्याध्यक्ष पदी महिला नेतृत्व गुणसंपन्न व्यक्तीमत्व
श्रीम. हेमलता सखाराम कोळेकर (बनकर)यांची निवड करणेत आली. श्रीम हेमलता कोळेकर मॅडम सध्या गडमुडशिंगी केंद्रातील कन्या गडमुडशिंगी शाळेत कार्यरत असून शैक्षणिक, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात. मागील दहा वर्षांपासून शिक्षक संघाचे अविरत कामे करून गडमुडशिंगी, गांधीनगर केंद्रात संघटना वाढवण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आज श्रीम. कोळेकर मॅडम यांची तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करणेत आली.
या प्रसंगी मा.व्हॉ. चेअरमन श्री बाजीरावजी कांबळे, संचालक श्री प्रशांतजी पोतदार, तालुकाध्यक्ष श्री मारुती दिंडे, पतसंस्थेचे व्हॉ. चेअरमन श्री ज्ञानदेव यादव, मा. चेअरमन श्री सातप्पा चौगुले, महिला कार्यकारी अध्यक्ष सौ शुभांगी मेथे पाटील मॅडम, मा श्री शाहू बनकर सर, श्री राहुल कदम, श्री देऊडकर सर, श्री सुकेश पाटील, श्री संतोष चिमले, श्री विजय मालाधारी सर्व शिक्षक संघ प्रेमी उपस्थित होते.