वाढवणा (बु) येथे सोयाबीन तुर मोफत बियाणे वाटप
उदगीर प्रतिनिधी - - गणेश मुंडे
उदगीर तालुक्यातील वाढवणा बु येथील शेतकरी राजेंद्र सुधाकर जोशी यांच्या शेतात राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांनी भेट दिले.यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना खते बियाणे याची कमतरता भासु देणार नाही असे आश्वासन ही दिले.यावेळी कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या सोयाबीन व तूर प्रात्यक्षिक प्रकल्पाचे बियाणे प्रातीनीधीक स्वरूपात शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले रुंद वरंबा सरी पेरणी यंत्राची पाहणी करून जास्तीत जास्त क्षेत्रावर या पद्धतीने नियोजन करण्याच्या मार्गदर्शन शेतकरी बांधवाना दिले.बियाणे ,खत वेळेवर गुणवत्तापूर्ण व योग्य किंमतीत उपलब्ध करून देणेबाबत कृषी विभागाला सुचना दिल्या आहेत.कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या रुंद वरंबा सरी पेरणी पद्धत,बीज प्रक्रिया,नींबोळी अर्क बाबत सविस्तर माहिती घेतली.तसेच उपस्थित सर्व शेतकऱ्यांना पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या वरील आधुनिक तंत्रद्नाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय कृषी अधिकारी महेश तिर्थकर,तालुका कृषी अधिकारी एस.बी.मोकळे,मा.नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे,मा.सभापती कल्याण पाटील,रामराव बिरादार,ज्ञानेश्वर पाटील,शिवाजी मुळे,प्रा.श्याम डावळे,माधव कांबळे,दत्ता बामणे,अमजद पठाण,कृषी सहायक प्रशांत खेळगे,ग्रामसेवक ए एस शिंदे तसेच परिसरातील प्रगतशील शेतकरी आदी उपस्थित होते.
सर्व शेतकऱ्यांनी आता आधुनिकतेची कास धरून शेतात नेहमी नवनवीन प्रयोग केले पाहीजे आणि शेतीतील उत्पन्न वाढवले पाहिजे. तालुका कृषी विभागाने नेहमी शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे
एस.बी.मोकळे
उदगीर तालुका कृषी अधिकारी