पट्टणकोडोली :
पट्टणकोडोली तालुका हातकणंगले व परिसरात शेती ला पुरख व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय करणारे शेतकरी. तसेच पशुपालन करणारे सुशिक्षित बेरोजगार युवक हे सध्याच्या परिस्थितीत संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी दुभत्या गायी म्हैशी खरेदी साठी बँकांची कर्जे,घेतली आहेत. सध्याच्या जनावरांना देण्यात येणारा चारा पशुखाद्य्याचे वाढलेले भरमसाठ दर . जनावरांच्या आजारपणातील औषध उपचार याचा मेळ कशा प्रकारे घालायचा या विचाराने शेतकऱ्यांच्या पदरी नैराश्य आले आहे.. भाजप सरकार काळात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी 5 रुपये लिटर मागे अनुदान दिले होते. सध्याच्या सरकारने 10 रुपये अनुदान देऊन शेतकरी व बेरोजगार युवकांना आधार द्यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राज्यभर करण्यात आली. निवेदन देताना बाळासाहेब कामांना , बाळासाहेब कुशाप्पा , कृष्णात रेवडे, रणजित पिराई हे रा स प चे पदाधिकारी यांनी तहसिलदार हातकणंगले यांचे कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.