सैनिक टाकळी (प्रतिनिधी)
श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल सैनिक टाकळी या विद्यालयाची विद्यार्थीनी कु.हर्षदा प्रदिप पाटील हिची जवाहर नवोदय विद्यालय , कागल करिता इयत्ता ६ वी मध्ये निवड झालेबद्ल प्रशालेचे शिक्षक आर एम पाटील व खोपडे आर एस. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर एन एम एम एस परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र झाले बद्दल राजवर्धन सुहास माळगे या विद्यार्थ्यांचा सत्कार गुरव ए टी व धुमाळे एम एम यांच्या वतीने करण्यात आला .या वेळी मुख्याध्यापक व्ही टी पाटील ,उदय पाटील, कुंभार बी एम बावचे एस ए व सर्व शिक्षक उपस्थित होते .