Monday 22 June 2020

mh9 NEWS

आरोग्यासाठी योगासने महत्वाची - गीतांजली ठोमके कोल्हापूरमधील योगाडान्स स्टुडिओमध्ये सहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी दि. 21 

कोल्हापूरमधील योगाडान्स स्टुडिओमध्ये सहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन ऑनलाईन झूमच्या माध्यमातून घेण्यात आला.योगा डान्स स्टुडिओ चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . याप्रसंगी योगा गुरू श्री जयंत वामन पडसलगीकर सोलापूर यांचे मुद्रा विज्ञान ,मुद्रा प्रात्यक्षिके आणि ड्रगलेस थेरपी या विषयावर एक लेक्चर , तसेच  आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या नियमावलीप्रमाणे योगा सेशन अॉनलाईन संपूर्णपणे मोफत   घेण्यात आले . योगा प्रात्यक्षिके गीतांजली ठोमके यांनी सादरीकरण केले. दोन्ही कार्यक्रमांचा सुमारे 100 लोकांनाही फायदा घेतला.
योगा आणि डान्स याचा मिलाफ असलेला योगा डान्स ही एक नवीन प्रणाली तसेच फेस योगा सर्वप्रथम  कोल्हापूरमध्ये  योगा डान्स स्टुडिओनी राबवलेली आहे ही संस्था गेले तीन वर्ष कोल्हापूर मध्ये कार्यरत आहे कोल्हापूर सह पुणे , इचलकरंजी ,सोलापूर येथे विविध कार्यशाळा घेतल्या जातात   फेस योगा, ब्रेन योगा , स्ट्रेस मॅनेजमेंट सप्तचक्र मेडिटेशन, ध्यान, पर्सनालिटी डेव्हलोपमेन्ट अशी विविध उपक्रम संस्थेकडून राबवण्यात येतात . महिलांचे आरोग्य हे विशेषत्वाने केंद्रित केले जाते . एकवीस दिवसाचा  मेडिटेशन कोर्स गेले   संपूर्णपणे मोफत घेतला जातो. 

ह्या तीन वर्षात महानगरपालिका प्राथमिक शाळांमधून विद्यार्थ्यांना मोफत योग प्रशिक्षण, महिलांसाठी आरोग्यविषयक मोफत सेमिनार ही घेतली गेली आहेत लॉकडाउनच्या काळात टेलिफोनिक relaxation सेशन्स ,ऑनलाईन योगा मेडिटेशन  संपूर्ण विनामूल्य घेतली गेली ,कोल्हापूर,पंढरपूर मुंबई , सोलापूर ,पुणे , सुरत, हैद्राबाद , गल्फ कंट्री मधूनही सुमारे 35 कुटुंबे ह्या  उपक्रमात झाली होती
  योगा डान्स आणि तसेच फेस योगा हे आज राष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यात योगा डान्स स्टुडिओ कोल्हापूर हे यशस्वी झालेला आहे  मिळावा  महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मॅरेथॉन , योगोत्सव  मध्ये सहभागी होण्यासाजी  प्रोत्साहित केले जाते 
14 ते 64 ह्या वयोगटातील महिला आज योगा डान्स स्टुडिओ च्या उपक्रमात सहभागी झालेल्या आहेत   नागाळा पार्क ब्रांच गीतांजली  ठोमके सांभाळतात . योगा फोर बिगीनर, ब्रेन योगा ,पार्टनर योगा असे कोर्सेस नागळा पार्क येथे चालतात . सर्व ऑनलाईन workshop ,आणि सकाळची ऑनलाईन batch योगा डान्स स्टुडिओ प्रेसिडेंट शिल्पा देगावकर घेतात .शारीरिक आणि मानसिक स्थैर्यासाठी विकासासाठी योगाचा प्रचार आणि प्रसार हे ध्येयं घेऊन ही संस्था  कार्यरत आहे.
आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनामध्ये रुद्रांश अकॅडमीचे दीपक बिडकर , राहुल बिडकर डॉक्टर कल्याणी कुळकर्णी, मा, सौ अरुंधती महाडिक , शुभांगी खासनीस पूणे,संजय हळदीकर , राजन यादव डॉ नीता नरके ,डॉ शिल्पा बेनाडे,वैशाली पाटील ,केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे आभार शिल्पा देगावकर यांनी मानले.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :

4 comments

Write comments
Unknown
AUTHOR
22 June 2020 at 06:21 delete

Yoga dance studio 3rd anniversary. Hum fit to India fit

Reply
avatar
Unknown
AUTHOR
22 June 2020 at 06:31 delete

Fusion way to wellness

Reply
avatar
Unknown
AUTHOR
22 June 2020 at 07:14 delete

Congratulations. Very good appreciated all your efforts. Keep going 👍🏻

Reply
avatar
Unknown
AUTHOR
22 June 2020 at 10:10 delete

Congratulation mam💐💐

Reply
avatar