कोल्हापूर प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले गिरगाव तालुका करवीर येथे शाहू महाराज यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थ भास्कर कुरणे, दिपक पाटील, सुहास चव्हाण, पांडुरंग पाटील , सर्जेराव कुंभार , सचिन कदम , निवृत्ती कुरणे यांच्यासह भगवान कोईगडे , अभिजीत भोसले , धनाजी मोरबाळे , निलेश सुतार , मदन परिट यांची प्रमुख उपस्थिती होती. गिरगावच्या सरपंच संध्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण झाले .
तसेच फिरंगोजी चौक येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस माजी सैनिक निवृत्ती कुरणे भास्कर कुरणे आनंदा गुरव पांडूरंग पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष रुपेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
राजर्षी शाहू महाराज यांनी बजेटमधील 26 % रक्कम शिक्षणावर खर्च केली .गिरगावकरांनी शपथ घेऊन पुढची पिढी घडवण्यासाठी आपल्या उत्पन्नातील 26% रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावी असे आवाहन केले.