कोल्हापूर. प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शुक्रवार दि. 26 जून 2020 रोजी सकाळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, कोल्हापूर येथे राजर्षि छत्रपति शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमस्थळी धार्मिक दुफळी माजवणे बंद करा, चीनला अद्दल घडवा, गलवान खोर्यात शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली, आम्ही भारतीय जवानांसोबत अशा आशयाचे फलक घेऊन असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या यावेळी सर्वांनी मास्क लावून व डिस्टन्सिंगचे पालन करत जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री नामदार सतेज डी पाटील, नामदार विश्वजीत कदम, आमदार पी एन पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, बजरंग पाटील तात्या (जिल्हा परिषद अध्यक्ष ), शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संजय मोहिते, गुलाबराव घोरपडे, तौफीक मुल्लाण्णी, शारंगधर देशमुख, बाळासाहेब खाडे, सदाशिव चरापले, संध्या घोटणे, अश्विनी धोत्रे (प स सभापती ), सचिन चव्हाण, सुरेश कुऱ्हाडे, सुशील पाटील कौलवकर, सुलोचना नायकवडे, शंकरराव पाटील, हिंदूराव चौगले, शिवाजीराव कांबळे, बयाजी शेळके, संजय वाईकर, मोहम्मद शेख, उमेश पोर्लेकर , चंदा बेलेकर, भूपाल शेटे, प्रताप जाधव, पार्थ मुंडे , दिपक थोरात, डॉ रमेश बुलबुले, एम एन पाटील, किशोर खानविलकर, सचिन घोरपडे तसेच विविध सेलचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका कार्यकर्ते आदी उपस्थित होते.