माजगाव प्रतिनिधी:-
आज शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री मा .ना . हसन मुश्रीफ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली . व निवेदन दिले . विस्थापित झालेल्या शिक्षकाना तसेच पती पत्नी, गंभीर आजार,५३ वर्षावरील गैरसोयीत असणाऱ्या शिक्षकांना सोयीत आणण्यासाठी जिल्हांतर्गत बदल्या झाल्या पाहिजेत तसेच आंतर जिल्हा बदलीचे ऑनलाईन माहिती भरुन तयार आहे . त्याही बदल्या करुन बाहेरच्या जिल्ह्यात अडकून पडलेल्या शिक्षकाना न्याय द्यावा असा आग्रह धरला .
यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री मा.ना. हसन मुश्रीफ साहेब म्हणाले की तुम्ही ज्यावेळी भेटता त्यावेळी बदल्या करणेचा आग्रह धरता, परंतू कोरोना संकटामूळे आम्ही बदल्या करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता .आता बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून मंत्रीमंडळामध्ये ही याची मी चर्चा करुन जुलै अखेर बदल्या करण्यासाठी मान्यता घेतली आहे . त्यासाठी बदली समितीला सॉफ्टवेअर तयार करणेस सांगितले असून जिल्हांतर्गत व आंतर जिल्हा सोयीच्या बदल्याचे धोरण राबविले जाईल असे स्पष्ट केले . शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मा.ना. हसन मुश्रीफ साहेब यांचे आभार मानले व या बदल्या लवकरात लवकर झाल्या तर शिक्षकांच्या मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होवून शैक्षणिक कामकाजही शिक्षकांच्या हातून अतिशय चांगले घडेल असा विश्वास ही शिष्टमंडळाने मंत्री महोदयांना दिला .
जिल्हांतर्गत व आंतर जिल्हा बदल्या व्हाव्यात म्हणून राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वा खाली अनेक वेळा शिष्टमंडळ भेटले होते . त्यामूळेच शिक्षक संघाच्या प्रयत्नाला यश आले आहे . या शिष्टमंडळात बँकेचे चेअरमन नामदेव रेपे, बँकेचे संचालक राजमोहन पाटील, बाजीराव कांबळे, जी . एस . पाटील, कागल तालुका अध्यक्ष तुकाराम राजूगडे, एच एन पाटील, रावणसर, सखाराम राजूगडे, आदी उपस्थित होते .