सैनिक टाकळी( प्रतिनिधी)
देशात आलेल्या कोरोनो सारख्या महाभयंकर आपत्तीमध्ये आपल्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता २४ तास अविरतपणे सेवा केल्याबद्दल राज्याचे आरोग्य राज्य मंत्री डॉ.राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या हस्ते सैनिक टाकळीतील डाॅ.संजय पाटील यांचा कुरूंदवाड येथील दयावान तालीम यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. कोरोना सारख्या महाभयंकर रोगाशी तोंड देत असताना पोलीस कर्मचारी, होमगार्ड, स्वछता कर्मचारी ,डॉक्टर, नर्स आदिंनी आपला जीव धोक्यात घालून सामाजिक सेवेबरोबरच आपले कर्तव्य बजावण्याचे काम केले आहे. मंडळाच्या वतीने या सर्व क्षेत्रातील कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.