Saturday, 20 June 2020

mh9 NEWS

जलसाक्षरता अभियानच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिवस चकवा येथे साजरा साधकाला दिले वृक्ष भेट आणि कडू लिंबाचे पाच पाने खायला

*""*


वाशिम प्रतिनिधी रजनिकांत वानखडे 

जलसाक्षरता अभियान वाशिम पाटबंधारे विभाग वाशिम आणि यशदा पुणे यांच्या सयूक्त विदेमानाने 
जलदूत तथा योगशिक्षक रविंद्र इंगोले(योग शिक्षक पदविका नाशिक विद्यापिठ ) यांनी स्वताच्या घरी अंतरराष्ट्रीय योगदिवसाच्या निमीत्ताने योग अभ्यासांचा कार्यक्रमचे आयोजन केले होते,योगाचे महत्व योगसने, प्राणायाम.आणापाणसती ध्यान करून सहभागी साधकांना दिले *वृक्ष* भेट व *कडू लिंबाचे* पाच पाने खायला. 
योगाचे महत्व सांगताना म्हनाले.योग हा युज धातू पासून बनलेला शब्द आहे त्यांचा अर्थ होतो जोडणे शरिर आणि मन यांना जोडतो.आजाराचे दोन प्रकार आहेत शारिरिक माणसीक दोन्ही निरोगी ठेवण्याचे काम योग करतो संस्कृत मध्ये सुभाषित आहे *"तत क्षियते प्रकाशावरणम"* मानवी शरिर यंत्र हे स्यवंम दुरूस्तीचे यंत्र आहे. *नित्य नियमाने योगा केला तर निरोगी शतायूषी होता येते यो* गसने प्राणायाम केव्हा किती करावीत हे शुध्दा सांगितले.आसनाची व्याख्या 'स्थिर सुख आसणम, चारही प्रकारचे आसने घेतली 1 *बैठकस्थितील आसने* पदमसन, व्रजासन, पर्वतासन इ.2 *शयनस्थितील आसने* शवासन, सर्वांगासन इ.3 विपरित शयनस्थितीती आसने भुंजागासन, धनुरासन इ.4 *दंडस्थितीतीर आसणे* ताडासन ई *.प्राणायाम* अनुलोम विलोम,भ्रामरी, उज्जायी, भास्त्रिका ई *.बंध* जालधर,मूल, उड्डियान ई.डोळाची आसने नंतर *आणापानसती ध्यान* केले.कार्यक्रम चे सुत्रसंचालन विकी भगत.सहभागी मनोरमा इंगोले, प्रतिभा मनवर,संदेश चुबंळे, अनिकेत मनवर, दुर्गाबाई इंगोले.इ.आभार प्रा.एस.बि.इंगोले यांनी केले कार्यक्रम यशस्वी जलसाक्षरता टिमने केला.


mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :