शिरोळ प्रतिनिधी
अ, लाट जि. कोल्हापुर येथे 2019 मध्ये आलेल्या प्रलयकारी महापुरात शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यावेळी नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनाने पंचनामे करून कोट्यवधी चा निधी पाठवला होता परंतु तळागाळातल्या शेवटच्या नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना हा निधी न पोहचवता
नुकसान न झालेल्या आणि लागेबांधे सांभाळण्याच्या नादात वेगळ्याच लोकांच्या घरात हा निधी खिरापत समजून वाटल्याची अनेक प्रकरणे बाहेर पडु लागल्याने संपुर्ण चौकशी लावून हा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रा,संजय परीट यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.
मात्र या वाटपात मोठा घोळ झाल्याचे आता उघड होत आहे,वारंवार मागणी करूनही लाभार्थ्यांची जाहीर होत नव्हती. परंतु राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकरसो यांनी आढावा बैठकीमध्ये नागरिकांच्या मागणीवरून यादी जाहीर करण्याचा आदेश दिला आणि यावर प्रशासनाने अस्पष्ट आणि वाचता न येणाऱ्या पुसट याद्यांचे झेरॉक्स एका टॅग मध्ये लावून जनतेची चेष्टा केली आहे.
प्रत्यक्षात ज्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे अशा अनेक बड्या आणि जवळच्या लोकांची नांवे यादीत घसडले नुकसानग्रस्त लोकांचे नावावरचे अनुदान दुसऱ्याच जवळच्या लोकांच्या बँक खात्यावर जमा करणे,घरात पाणी न येताच अनेकांना लाभ मिळाले. बोगस लाभार्थी मदत तर खरे नुकसान झालेले अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत अशा अनेक तक्रारी आता पुढे येत आहेत.या प्रकरणात शासनाच्या निधीचा गैरवापर करून गरीब लोकांच्या तोंडचा घास पळवण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे या संपुर्ण प्रकरणाची माहिती घेऊन अन्याग्रस्त नागरिकांना तक्रारी देण्याचे आवाहन केले आहे,
संपूर्ण माहिती मिळताच शेवटच्या माणसापर्यंत ही मदत मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून यातील दोषी आणि जबाबदार घटकांवर कारवाईची मागणी आपण तहसीलदार,जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयात करणार असुन फुकटचे लाटलेले अनुदान वसूल करण्यासाठी ही प्रसंगी जनआंदोलन उभे करणार असल्याची माहितीही या निवेदनाद्वारे प्रा,संजय परीट यांनी केली असून अन्यायग्रस्त नागरिकांनी तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या लेखी तक्रारी द्याव्यात असे आवाहन ही त्यांनी
केले आहे.