महसूल अधिकारी,आरोग्य कर्मचारी,पोलीस अधिकारी,नगरपरिषद अधिकारी व सर्व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाला यश.
उदगीर प्रतिनिधी :-गणेश मुंडे
उदगीर तालुक्यामध्ये एकुण 70 पॉझिटिव्ह रुग्णां पैकी 56 रुग्णांना या आगोदर सुट्टी देण्यात आली होती,आज 10 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. बाकी 1 रुग्णास उद्या दवाखान्यातून सुट्टी दिली जाणार आहे तर 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. असी माहिती उदगीर उपजिल्हाधिकारी डॉ प्रविण मेंगशेट्टी यांनी पत्रकाराना बोलताना दिले उदगीर तालुक्यात 24 मार्च पासून आज पर्यंत 22830 जणांना कोरंटाईन करण्यात आले होते त्यापैकी 721 जणांना इंसुलेशन कोरंटाईन केले होते, त्यात एकुण 70 रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले होते त्यापैकी शहरात 40 तर ग्रामीण भागातून 30 असे रुग्ण आढळून आले होते. आज च्या दिवसी येथील रुग्णालयात 11 रुग्ण आहेत त्या पैकी 10 रुग्णांना आज सुट्टी दिली गेली तर 1 रुग्णास उद्या सुट्टी दिली जाणार आहे.त्यामुळे सर्व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने हे साध्य होत आहे. येथील डॉ हरिदास,पवार देशपांडे, सत्तारी,श्रीकांत मुंडे शेळकीकर, कुलकर्णी,विभुते,सोनवणे,महिंद्रकर, कडावकर,मुसने,जाधव,स्वामी, बिरादार,डांगे,साताळकर, कदम, वाघमारे, मुकरे, डावरे, पाटिल, नपा कर्मी, पुलिसकर्मी ने जे काम केले आहे त्याच्याच जोरावर आज उदगीर कोरोंना मुक्त होत आहे, त्यात उदगीर महसूल अधिकारी,आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी,नगर पालिका अधिकारी व कर्मचारी,या सर्व कर्मचारी यांची प्रमुख भूमिका यात आहे
यावेळी उदगीर तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर, नपा मुख्याधिकारी भरत राठोड,शहर पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण,ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपक वाघमारे,डॉ हरिदास, डॉ पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सोनवणे, डॉ देशपांडे,डांगे,दत्ता पाटील आदी उपस्थित होते,आज 10 रुग्णांना दवाखान्यातून सुट्टी दिल्याने उदगीर तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे,पुढील काही दिवस नागरीकांनी सावधाता बाळगावी असे अव्हाण प्रशासनाच्या वतीने अव्हाण करण्यात येत आहे.