केंद्रशाळा नागदेवाडी तालुका करवीर शाळेतील पदवीधर अध्यापिका सौ मीना बंडु संकेश्वरे ३८ वर्षे सेवा बजावुन निवृत्त झाल्या. त्यानिमित्य नागदेवाडी शिक्षक स्टाफ व शा.व्य.समिती मार्फत सदिच्छा समारंभ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा. रमेश निगवेकर सर यांनी केले.
सौ मीना बंडु संकेश्वरे यांचा सत्कार मा. डी. ए. पाटील साहेब शि. वि अधिकारी पं.स.करवीर यांचे हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शा.वि समिती चे अध्यक्ष मा. दिगंबर जाधव साहेब यांनी भुषविले. कार्यक्रमास मा. शिवाजी ढेरे साहेब ,मा श्रीकांत दिवसे साहेब ,सौ भारती जाबिलकर , सौ आश्विनी गायकवाड, सौ शीतल ढेंगे हे उपस्थित होते.
सुत्रसंचलन सौ अस्मिता कुलकर्णी यांनी केले .कार्यक्रमास श्री मारुती पाटील सर ,सौ जैनब शेख मँडम, सौ जयश्री मामिलवाड मँडम उपस्थित होते. आभार प्रदर्शन सौ शैलजा पाटणकर यांनी केले.