*कोल्हापूर प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमे निमित्ताने प्रत्येकी एकतरी रोप लावून संवर्धन करावे हीच खरी पर्यावरणपूरक वटपौर्णिमा.
प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेयर आणि प्रगती सेवा भावी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कसबा बावडा येथील महिलांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करत रोपाचे वाटप करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनासाठी किमान एक रोप लावून त्याचे संगोपन करावे, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
यावेळी, सौ. सुमन ढेरे, कल्पना पाटील, आशा पाटील, भारती बोनगे, सुलभा उलपे, रंजना चव्हाण, सोनल पवार, जयश्री माळी, सायली ढेरे, विद्या चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
-