अखेर महाराष्ट्रावर घोंगावणारे निसर्ग वादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकलं. मात्र मुंबईवरचं संकट टळलं आहे. चक्रीवादळ रायगडमधून अलिबाग, पेण, पनवेल मार्गे ठाण्याच्या दिशेने नाशिककडे वळले. मुख्यतः पालघरला जो रेड अलर्ट इशारा दिला होता त्याचा यत्किंचितही परिणाम दििसून आला नाही.
सध्या तरी संकट टळलं अशी परिस्थिती असताना पावसाचा जोर कायम राहील. पुढच्या 6 तासात वादळाचं संकट दूर होऊन हळूहळू वादळाची तीव्रता कमी होणार, हवामान विभागाची माहिती, ठाणे, पालघर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस बरसतच राहणार. त्यामुळे वादळापासून दिलासा मिळाला असला तरी प्रवास करताना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.