सैनिक टाकळी प्रतिनिधी
कोरोना चा संसर्ग जगभर पसरला असून अनेक देशांमध्ये या रोगाने थैमान घातले यावरती नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याने प्रत्येक देशाने हा पर्याय स्वीकारून या रोगा वरती मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे . परंतु या काळामध्ये अनेक उद्योगधंदे बंद पडले याचबरोबर मजुरांना काम देखील नसल्याने त्यांचे हाल झाले . यावेळी अनेक स्वयंसेवी संस्था दानशूर लोक पुढे येऊन आपल्या परीने या लोकांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सैनिक टाकळी येथील माहेरवाशीण वैष्णवी पाटील यांनी देखील येथील कोरोनामुळे रोजगार साठी बाहेर न पडू शकलेल्या गरजू व गरीब कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे या कुटुंबांना संसारोपयोगी साहित्य त्यांनी स्वखर्चातून वाटप केले. गतवर्षी त्यांनी या भागांमध्ये ज्यावेळी पूर आला तेव्हा पुरगस्त कुटुंबांना देखील अशाच प्रकारचे मदत केली होती. सध्या त्या नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशन तसेच सयाजी शिंदे सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संगोपनाचे काम करतात. त्यांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कामी त्यांना त्यांचे पती विनायक पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.