प्रतिनिधी: प्रमोद झिले हिंगणघाट वर्धा
महात्मा जोतीराव फ़ुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांपासून अतिरिक्त व्याजाची रक्कम वसूल करणाऱ्या बँक अधिकारी यांचावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री विवेकजी भिमानवार यांना प्रहारचे नेते रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचा नेतृत्वात निवेदन --
महाराष्ट्र शासनाचा वतीने महाराष्ट्रातील सर्व शेतकार्याना दोन लाख रुपये पर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱयांचे कर्ज माफ झाले परंतु जिल्ह्यातील बहुतांश बँक मध्ये या वर्षीच्या पीक कर्जासाठी जाणाऱ्या शेतकार्यान कडून अतिरिक्त व्याजाचा नावाखाली अतिरिक्त व्याज शेतकरी वर्गाकडून वसूल करीत असल्याचा तक्रारी प्रहारचे रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचा कडे आल्या असता दिनांक 2 जून रोजी पंचायत समिती हिंगणघाट येथे उपजिल्हाधिकारी श्री लटारे साहेब यांचा समक्ष हा प्रकार समोर आणून दिला असता बँक अधिकारी हे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही 3 जूनला सर्व शेतकरी व रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचे सह हिंगणघाटचे तहसीलदार श्री मुंदडा साहेब स्वतः हिंगणघाट येथील महाराष्ट्र बँक येथे जाऊन चौकशी केली असता बँकेचा चुकीमुळे कर्जमुक्ती झालेल्या शेतकार्याना विनाकारण अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड पडत असल्याचे लक्षात आले
आज जिल्हाधिकारी श्री विवेकजी भिमनवार हे हिंगणघाट समुद्रपूर तालुक्याचा दौऱ्यावर असता जाम चौक येथे प्रहारचे रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचा नेतृत्वात सर्व शेतकरी यांनी एक निवेदन देऊन अतिरिक्त व्याज भरणाऱ्या शेतकऱयांचे पैसे परत करण्यात यावे या करिता व आता या पुढे शेतकऱयांना अतिरिक्त व्याज आकारण्यात येऊ नये या करिता निवेदन देण्यात आले
यावेळी जिल्हाधिकारी विवेकजी भिमनवार यांनी वर्धा जिल्ह्यातील कोणतीही बँक अतिरिक्त व्याजाकरिता सक्ती करणार नाही या संदर्भात लवकरच सर्व बँकेना सूचना देण्यात येईल असे सांगितले व अतिरिक्त व्याज भरलेल्या शेतकऱयांना चौकशी करून रक्कम परत करण्यासंदर्भात ही सूचना सर्व बँकांना देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी हिंगणघाट चंद्रभानजी खंडाईत व समुद्रपूरचे तहसीलदार रणवीर सोबत होते
निवेदन देते वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख जयंत तिजारे, जामचे उपसरपंच व प्रहार युवा संघटनेचे पदाधिकारी अजय खेडकर, सुरज शंभरकर,विजय पडोळे,सुरेश कापसे,सुरज कापसे,किरण पाहुणे,मंगेश चंदनखेडे,अमोल झाडे,शेषराव कामडी, लक्ष्मण लोहकरे,रवींद्र चंदनखेडे,श्रीराम कापसे,श्रीकांत महाजन, आकाश देवढे,विठ्ठल पोहणे,महादेव अवचट,शुभम नांदूरकर,शीतल आदमाणे,किशोर कामडी,संभा कापसे,महादेव महाजन, किशोर मेघरे,विक्रम खोडे इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते