उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
सध्या देशावर कोरोना सारख्या रोगाने हाहाकार माजविला असल्याने देश आर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळे वाढ दिवसाचा ईतर खर्च टाळून बिपिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तोंडार येथील ११ वयोवृद्ध महिलांना धान्य किट चे वाटप ओम साई सेवा भावी संस्थेच्या वतीने करण्यात आले.
या वेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार पांडे, यांचा हस्ते वाटप करण्यात आले.
सध्या देशावर कोरोना रोगा मुळे गोर गरीबांचे हाल झाले आहेत, मोल मजुरी करून खाणाऱ्या लोकावर उपासमारीची वेळ आली आहे, हाच विचार करून सतत समाजकार्यात अग्रेसर असलेल्या तोंडार येथील ओम साई सेवा भावी संस्थेचा वतीने दि: ०५/०६/ रोजी उदगीर येथील युवा उद्योगपती बिपिन भैय्या पाटील यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून गावातील अती वयो वृद्ध असलेल्या व विधवा असलेल्या ज्यांना आपल्या हाताने जेवण करून खता येणार नाही, अशा महिलांची सर्व्हे करून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार पांडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना एक महिना पुरेल इतका ज्वारी, तांदूळ,गहू, साखर , चहा पत्ती. ,जिरे, तेल, हळद, मीठ,मिरची ,अशी अन्न धान्य चे किट देऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आले व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विपिन पाटील यांच्या हस्ते उपसरपंच निळकंठ बिरादार यांच्या कडु निंबाचे रोपटे लाउन शेतात व्रक्षारोपन करण्यात आले, या वेळी प्रभुदेव निटुरे,शिवा गोरे,सुशील पेन्सा लवार,प्रतीक गुंडरे,श्रीनिवास रायचुरकर ,पप्पू दुरुगकर,विश्वजित राठोड, शासकीय ठेकेदार प्रशांत पाटील, गायत्री हॉटेल चे मालक सुनील मेंगा,मंडळाचे मार्गदर्शक शिवलिंग अप्पा नावंदे, उपाध्यक्ष वीरभद्र (भैया) बिरादार, नीलकंठ बिरादार, रामेश्वर बिरादार, संग्राम भिंगोले, कैलास खिंडे, गोविंद पांडे,संदीप बिरादार,माधव पांडे, दशरथ पांडे, इ सदस्य उपस्थित होते,तर संगमेश्वर स्वामी, मारोती कोरे, सोमेश्वर मालोदे, प्रशांत इंद्राळे ,यांनी परिश्रम घेतले या वेळी मंडळा चा वतीने सामाजिक अंतर ठेऊन शासनाचा आदेशाचे काटेकोर पणे पालन केले.