कोल्हापूर प्रतिनिधी -
कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर तळागाळात काम करणार्या ग्रामपंचायत कर्मचारी "कोरोना योद्धा" म्हणून कागल तालुक्यामध्ये प्रभावी काम केले बद्दल कौतुक व अभिनंदन
कागल तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संघटना पदाधिकाऱ्यांची कागल पंचायत समितीच्या सभागृहामध्ये बैठक पार पडली यावेळी सभापती विश्वास कुराडे म्हणाले की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके ,प्रॉव्हिडंट फंड , किमान वेतन, सुधारित राहणीमान भत्ता ,विशेष असणाऱ्या देय रजा ,याबाबत तालुकास्तरावर आढावा घेऊन यामधील कोणताही प्रश्न मागे राहणार नाही याची खबरदारी घेणेत येईल.
तळागाळात काम करणार्या ग्रामपंचायत कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी पंचायत समिती प्रशासन नेहमी सदैव तत्पर राहील असे आश्वासन या बैठकीवेळी दिले , ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा समूह अपघात विमा योजना ज्या ग्रामपंचायतीने उतरला नाही त्या ग्रामपंचायतीचा सुद्धा तात्काळ आदेश निर्गमित करण्यात येतील, कर्मचाऱ्यांची असणारी प्रॉव्हिडंट फंड खाती जिल्हा भविष्यनिर्वाह संघटन तिकडे वर्ग करणे बाबत माननीय नामदार हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून याबाबत ठोस निर्णय घेण्याबाबत शासनाला भाग पाडू असे अभिवचन त्यांनी यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेला दिले, या सर्व प्रश्नांबाबत माननीय सहाय्यक गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी सविस्तर आढावा घेतला या बैठकीला उपसभापती दीपक सोनार , विस्तार अधिकारी मुंडे हे उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी विविध अडचणींबाबत अधिकारी व पदाधिकारी यांच्या बरोबर चर्चा केली , तसेच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांची वेतनावर असणारी वसुलीची अट रद्द केल्याबद्दल तसेच कोरणा काळात काम करताना प्रोत्साहन अनुदान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन ठराव यावेळी करण्यात आला तसेच सभापती विश्वास कुराडे व सहाय्यक गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी कर्मचाऱ्यांना शासकीय ओळखपत्र दिल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन ठराव यावेळी करण्यात आला,
स्वागत तालुकाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले . यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष सुनील भारमल , सचिव प्रवीण ढेकळे तसेच इतर जिल्हा व तालुका पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आभार शंकर पाटील यांनी मानले,