पटट्ण कोडोली: (साईनाथ आवटे)
पटटण कोडोली तालुका हातकणगंले येथे हुपरी पोलिस स्टेशनच्या महा रक्तदान शिबिराच्या आव्हानाला प्रतिसाद देत 162 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
सध्या संपूर्ण जगभर कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. या कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी गणेश उत्सव मंडळानी इतरत्र अवाजवी खर्च न करता गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून रक्तदान शिबिर आयोजित करून 1000 बाटली रक्त हुपरी परिसरातून जमा करावे असे आव्हान हुपरी पोलिस स्टेशनचे पी. आय.राजेंद्र मस्के यांनी केले होते.त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत काल हुपरी येथे 400 जणांनी रक्तदान केले तर आज पटटण कोडोली येथे पहिल्याच दिवशी 162 जनांनी रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी हुपरी पोलिस स्टेशनचे पी आय राजेंद्र मस्के,बाळूमामा देवस्थान आदमापूर प्रमुख मानकरी कृष्णात वाघापूरे,उपसरपंच कृष्णाजी मसुरकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष मच्छींद्र जाधव ,राणोजी पुजारी, अनिल कांबळे, मुबारक शेख, अनिल बिरांजे, प्रशांत निकम,मोहन वर्धन , हुपरी पोलिस स्टेशनचे निवृत्ती माळी, दिपक कांबळे, दिपक सुतार इत्यादि मान्यवर मंडळी हजर होते. या रक्तदान शिबिराचे आयोजन शंभूराजे प्रतिष्ठान च्या मावळ्यानी करून यशस्वी पार पाडले.