*आरिफ पोपटे
एस. टी.महामंडळाच्या मालवाहू बस मधून वाहतूक होत असलेला तांदूळ कारंजा शहर पोलिसांनी कोळी फाट्याजवळ दिनांक २५/०७/२०२० रोजी पकडला वर उशिरा रात्री दिनांक २६/०७/२०२० रोजी शेलू बाजार येथील गावंडे ट्रेडर्स वर कलम ३ ,७, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा दाखल केला, या प्रकरणात पोलिसांनी बस ताब्यात घेतली असून त्यामध्ये २०० पोत्यापैकी तीन कट्ट्यावर मध्य प्रदेश, स्टेट सिव्हिल सप्लाईज कॉर्पोरेशन ली. आर. एम. एस.३ २०१९-२० व्हीट असा शिक्का आढळून आल्याचे व या मध्ये मोठे रॅकेट असल्याचा आरोप केले.सदर प्रकरणात आज दिनांक २९/०७/२०२० रोजी आरोपी नामे गणेश गावंडे यांना अटक करण्यात आली,
सदर प्रकरणात आरोपी कडून ॲड. जुनेद खान यांनी युक्तिवाद केला व विद्यमान न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला.