उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिन समारंभ लातूर जिल्हा परिषदेमध्ये सोशल डिस्टन्सचे नियम पाळून साजरा करण्यात आला. या वेळी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री राहुल केंद्रे यांच्या हस्ते लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण करण्यात आले.आज दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी स्वातंत्र दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा समारंभ लातूर जिल्हा परिषदेमध्ये साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व पदाधिकारी,सन्माननीय सदस्य, अधिकारी,कर्मचारी व लातूर जिल्ह्यातील नागरिक,शेतकरी यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिल्या.यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा.भारत बाई सोळंके मॅडम,कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे,समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे,स्थ्यायी समिती सदस्य संतोष वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव,आदींसह सर्व विभागांचे विभाग प्रमुख,यावेळी उपस्थित होते.