कंदलगाव ता. १४
अनंतशांती बहूऊद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातील आधिपारिचारिका,परिचारिकांना कोविङ योद्धा'ने सन्मानित करण्यात आले.हा सोहळा व्हीनस काॅर्नर जवळील वसंत रूत्तू हाॅलच्या सभागूहात पार पडला.
समाजातील भेदभाव संपविणाऱ्या कोरोना काळात अनेक स्तरातुन उच्चनिच भेदभाव न करता समाजसेवेसाठीअनेक मदतीचे हात पुढे आले.या प्रेरणेने गेली आठ वर्ष पाचशे हुन आधिक समाजिक उपक्रम राबिवलेल्या अनंतशांती संस्थेमार्फत कोरोना काळत एक लाख अर्सनिक अल्बम ३०ड्रम चे वितरण ग्रामिण डोगराळ दुर्गम भागात करण्यात आले. पन्नास हजार माहिती पञकाचे वितरण करुन कोरोणा विषयी जनजागृती केली तसेच वीस हजार मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. वाटसरुसाठी एक हजार फुड पँकेटचे वितरण केले. जिल्हातील पाचशेहुन आधिक ग्रामपंचायतना आँनलाईन कोरोना योध्दा प्रमाणपञाचे वितरण केले आहे.
सामाजीक उपक्रम दोनशे हून आधिक राबविले आहेत व दिडशे शैक्षणिक उपक्रम वाडी वस्तीतील लोकासाठी राबविले आहेत. महापुराच्या काळात विविध ठिकाणी शंभर हुन अधिक आरोग्य शिबीरे राबविली,पन्नास हजार रोपट्याचे वितरण व पाच हजार वृक्षाचे यशस्वी जतन केले आहे. कोरोणा काळात निस्वार्थी भावानेने मानव सेवा हिच ईश्वर सेवा या प्रेरणेने आपल्या व आपल्या कुटुंबाची जिवाची पर्वा न करता चोविस तास छञपती प्रमिला राजे रुग्णायला अंतर्गत रुग्णाची काळजी घेणे रुग्णाचे व नातेवाईकाचे समुपदेशन करणे रुग्णसेवेत कार्यरत असणाऱ्या व कोरोणा काळात काम केलेल्या आधिपरिचारिका, परिचारिका यांच्या कामाचा आढावा घेवुन याचा संस्थापक भगवान गुरव यांच्या मार्गदर्शना खाली अनंतशाती कोरोणा योध्दा पुरस्कार ने वितरण करण्यात आले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील यशोदा संस्थेच्या व्याख्याती राणी पाटील होत्या.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा माधुरी खोत यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला .यावेळी भगवान गुरव, अरुणा पाटील, लता जाधव,स्नेहलता जाधव, किरण लोकरे, प्रशांत पाटील, नारायण चिले,महेंद्र पाडंव, फिरंगोजी शिदे संस्थेचे वस्ताद प्रमोद पाटील यावेळी उपस्थित होते.यावेळी प्रार्थना शेलार, मनुजा रेणके, अंजली देवरकर, मानसी मुळे,विमल कलकुटकी, निला नबोदरी,ज्योती मोकाशी , ज्योस्ना पाटील ,राखी साळोखे, सुवर्णा लोखंडे ,ज्योती दळे, संगीता आळतेकर ,अपुर्वा किर्तने, दिपा सुर्यवंशी,आसिफा पटवेगार, पुष्पा राजमाने,शितल शेटे , सविता होवाळ,राजश्री चिदंगे, अलका गायकवाड, ज्योती मोकाशी,ज्योती आडारकर
आदीसह ३० परीचारिकांना पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले. संस्थेच्या सचिव अरुणा पाटील यानी सुञसंचालन केले.
फोटो - कोवीड काळात काम करणाऱ्या अधिपरिचारीका व परिचारीकांचा 'कोवीड योध्दा ' म्हणून सन्मान करताना संस्थेचे पदाधिकारी अरूणा पाटील, भगवान गुरव यांचे सह इतर मान्यवर .