उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
उदगीर ही शिक्षणाची पंढरी असून या शैक्षणिक पंढरीचा समृद्ध वारसा बिर्ला स्कुलच्या माध्यमातून पुढे चालविला जात असल्याचे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले.
गुणाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या तालुकास्तरावरील देशातील पहिल्या शाळेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जी,श्रीकांत होते.प्रतिकूल परिस्थितीत गुणाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून बापूराव राठोड यांनी केलेली शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती कौतुकास्पद असल्याचे केंद्रे पुढे बोलताना म्हणाले.मार्कवान विद्यार्थी निर्माण करणे हे शिक्षणव्यवस्थेपुढचे आव्हान नसून सामाजिक भावना निर्माण करणे हे आव्हान आहे,मातीला व मातृभूमीला जोडून ठेवणारा विद्यार्थी बिर्ला ओपन माईंडस मधून घडावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी व्यक्त केली.जिल्हा परिषद,उपाध्यक्ष सौ.भारतबाई साळुंके,जि.प.चे सभापती गोविंदराव चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहीदास वाघमारे,बाबासाहेब घुले,चेअरमन दगडू साळुंखे, गोदावरी विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष प्रा.नागनाथ निडवदे,जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके,अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे,उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी,तहसिलदार व्यंकटेश मुंढे,संस्थेचे अध्यक्ष बापूराव राठोड आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
प्रारंभ श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.बापूसाहेब राठोड,सौ.ज्योतीताई राठोड,दिगंबर राठोड,शाळेचे संचालक रमेश अंबरखाने,चंद्रकांत पाटील कौळखडकर,डॉ.माधव चंबुले आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.संस्थेचे सचिव अमित राठोड यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.सामाजिक भावना जागृत असणारा,कौटुंबिक मुल्ये जपणारा व जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारा विद्यार्थी निर्माण करावा असे आवाहन जी.श्रीकांत यांनी पुढे बोलताना केले.शाळांच्या वर्गखोल्यांएवढीच मैदाने बळकट व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.प्राचार्य श्रीमती पांडे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रा.आश्विनी निवर्गी व धनंजय गुडसूरकर यांनी सुत्रसंचालन केले तर बापूराव राठोड यांनी आभार मानले.समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त बाबासाहेब अरावत,समाजकलपाटील अधिकारी कमितकर,चंदरअण्णा वैजापूरे,पं.स,सभापती विजय पाटील आदी उपस्थित होते.